←

सातवी माळ

सातवा दिवस

फुलवरा

सात सुवासिनी, एक गवळा, एक कुमारिका यांचे पूजन करावे. ओटी भरावी. सुवासिनी जास्त सांगितल्या तरी चालेल. परंतु त्यांची दुसरीकडे ओटी भरलेली नसावी.

ओटीसाठी पत्रावळ, लाह्या (ज्वारीच्या), काकडी, खडीसाखर, डाळ्या, खोबरे, खारीक, १ फळ (यापेक्षा अधिक चालेल) देवांसाठी एकूण ७ ओट्या काढाव्यात. गावात देवीचे मंदिर असल्यास त्या त्या देवींना देण्याच्या दृष्टीने ओट्या वाढवाव्यात. शिल्लक राहिल्यास विसर्जन करावे.

सायंकाळी फाफड्याकरिता रवा १॥ कि. घ्यावा. दुधात केशर घालून कालवून, मोहन लावून फाफडे बनवावेत. देवांसाठी २५ फाफडे ठेवून बाकी डब्यात ठेवावेत. २५ फाफडे २-२ सुतळीमध्ये व २ फाफडे ऐकेका सुतळीमध्ये बांधून देवाच्या वरच्या बाजूस मखरेला असलेल्या हुकात बांधावेत. ५ फाफड्यांचा नैवेद्य दाखवावा. ते परत तसेच ठेवावेत. नैवेद्यामध्ये ढेबरी, पुरी असावी.

संध्याकाळी सर्वांना फराळ देताना त्यात १ फाफडे, १ ढेबरी, १ पुरी असे वाढावे व शिल्लक राहिलेले शेवटच्या दिवसाच्या प्रसादासाठी ठेवावे.

फुलवरा माळ
फुलवरा माळ